सोनिया गांधी स्थलांतरीत मजुरांच्या तिकीटाचे पैसे देणार होत्या, त्याचे काय झाले ?

jalgaon-digital
1 Min Read

दिल्ली | Delhi

भाजप BJP नेते आणि केंद्रीय रेल्वे मंत्री पीयुष गोयल Piush Goyal यांनी काँगेस Congress नेते राहुल गांधी Rahul Gandhi यांनी श्रमिक स्पेशल ट्रेनवरून रेल्वे खात्यावर केलेल्या टीकेला जोरदार प्रतिउत्तर देत त्यांनाच एक प्रश्न केला आहे.

त्यांनी ट्विट करत म्हंटले आहे, “देशाला लुबाडणारेच अनुदानाला नफा म्हणू शकतात. राज्य सरकारांकडून घेतल्या जाणाऱ्या रकमेपेक्षा रेल्वेने मजुरांसाठी चालवलेल्या गाड्यांसाठी अधिक खर्च केला आहे. सोनिया गांधी या स्थलांतरी मजुरांच्या तिकीटाचे पैसे देणार होत्या. त्याचे काय झाले ?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

राहुल गांधी यांनी सकाळी ट्विट करत श्रमिक स्पेशल ट्रेनवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हंटले होते, ” सरकार आपत्तीतही नफेखोरी करत आहे. लॉकडाऊनच्या काळात भारतीय रेल्वेने श्रमिक स्पेशल ट्रेनद्वार ४२८ कोटी रुपये कमावले आहे. हे सरकार गरिबांच्या विरोधात आहे.” आता हा वाद चांगलाच रंगण्याची शक्यता आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *