National Herald case : राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात

National Herald case : राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात

दिल्ली | Delhi

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधींची आज दुसऱ्यांदा ईडी चौकशी करण्यात येत आहे. चौकशीसाठी सोनिया गांधी ईडी कार्यालयात दाखल झाल्या आहेत.

दरम्यान सोनिया गांधी यांच्या ईडीच्या दुसऱ्यांदा चौकशीच्या विरोधात काँग्रेसकडून आज पुन्हा एकदा देशभर निर्देशने करण्यात येत आहे. विजय चौकात एकटेच आंदोलनाला बसलेल्या राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

राहुल यांच्याशिवाय काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल, शक्तीसिंह गोहिल यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे सर्व काँग्रेस खासदार संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत निषेध मोर्चा काढत होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com