सोनिया गांधींची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल

सोनिया गांधींची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल
सोनिया गांधी

दिल्ली | Delhi

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना दिल्लीमधल्या गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

२ जून रोजी सोनिया गांधी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमी आली होती. यानंतर त्यांनी स्वतःला विलगीकरणात टाकले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली.

ते म्हणाले की, सोनिया गांधी यांना रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. सर्व हितचिंतकांचे काळजी आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद. तिकडे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनिया गांधी यांच्या आरोग्याबाबत प्रार्थना केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com