कोणत्या आमदारांनी दगा दिला? संजय राऊतांनी थेट यादीच वाचली

कोणत्या आमदारांनी दगा दिला? संजय राऊतांनी थेट यादीच वाचली
संजय राऊत

मुंबई | Mumbai

मध्यरात्री उशीरा सुरू झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या (Rajyasabha election) मतमोजणीमध्ये महाविकास आघाडीला (MVA) मोठा धक्का बसला आहे.

बऱ्याच राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर शिवसेनेने (Shivsena) सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव झाला असून भाजपाचे धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा विजय झाला आहे. भाजपच्या या विजयात अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची धरली आहे.

दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही अपक्षांनी गद्दारी केल्याचा आरोप केला आहे. संजय राऊत यांनी थेट सहा आमदारांची नावं घेत त्यांनीच दगा दिल्याचा आरोप करुन एकच खळबळ उडवून दिली. हितेंद्र ठाकूरांची ३ मते, संजय मामा शिंदे, श्यामसुंदर शिंदे आणि देवेंद्र भुयार यांनी मविआला मते दिली नसल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

पुढे बोलताना संजयराऊत म्हणाले की, आमच्या मित्रपक्षांनी आमच्याशी दगाबाजी केली नाही. अपक्ष उमेदवारांनी आम्हाला शब्द देऊन मतदान केलं नाही. सहा सात मतं आम्हाला मिळाली नाहीत. आम्ही कोणत्या व्यवहारात पडलो नाही. आणि कुठला व्यापार केला नाही. तरीही संजय पवार यांना पहिल्या पसंतीची ३३ मतं मिळाली. हा सुद्धा आमचा एक विजय आहे.

तसेच संजय पवार यांच्या पराभवानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील व्यथित झाले आहेत. संजय पवार हे हाडाचे शिवसैनिक आहेत. तो राज्यातील सर्व जनतेने पाहिला. काहींवर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणण्यात आला. काही ठिकाणी इतर काही व्यवहार आहे. ठीक आहे आज ते जिंकले असतील. पण आम्ही उद्या पाहू, असं संजय राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com