यशोमती ठाकूर
यशोमती ठाकूर
राजकीय

भाजपचे आमदार आमच्या संपर्कात

शेणातला किडा ज्याप्रमाणे शेणातच राहतो तसे भाजपाचे झाले आहे

Nilesh Jadhav

मुंबई | Mumbai

मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या राजकीय घडामोडींनंतर महाराष्ट्रात देखील तशी परिस्थिती निर्माण होईल अशी चर्चा महाराष्ट्रात चालू आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ जारी केला असून त्यांनी त्यात म्हंटले आहे,

भाजपचे आमदार आमच्या संपर्कात असून त्यांची नावे कळली तर राज्यात भूकंप येईल.आमचे आमदार फुटणार नाहीत असंही यशोमती ठाकूर म्हटलं आहे. मध्यप्रदेश, कर्नाटक आणि आता राजस्थानमध्ये भाजपने आपला घाणेरडा खेळ आणि घाणेरडं राजकारण सुरुच ठेवलं आहे. शेणातला किडा ज्याप्रमाणे शेणातच राहतो तसं यांचं झालं आहे. केंद्रात सत्ता मिळाली असतानाही त्यांना राज्यांमध्ये फोडाफोडी करण्याची हाव आहे. मला सातत्याने महाराष्ट्रामध्ये काय असं विचारलं जातं. माझं सर्वांना सांगणं आहे राज्यातलं सरकार स्थिर आहे. जर कोणी सरकार अस्थिर करण्याचा किंवा पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला तर त्याला चांगलं बडवू. आम्ही गांधीवादी आहोत पण दादागिरी किती दिवस सहन करायची. नाठाळांच्या माथ्यावर काठी कशी हाणायची याची शिकवण आम्हाला मिळालेली आहे. तुमची गाठ आमच्याशी आहे लक्षात ठेवा, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com