Thursday, April 25, 2024
Homeराजकीयअपयशी सरकारमुळे साथीच्या आजार वाढले

अपयशी सरकारमुळे साथीच्या आजार वाढले

कोपरगाव (प्रतिनिधी)- सरकारने कोरोनाच्या संकटात योग्य ते नियोजन न केल्यामुळे संकटाची मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असुन अपयशी सरकारमुळे साथीच्या आजारात महाराष्ट्राचा एक नंबर असल्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था ढासाळली आहे. शेतकर्‍यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले असल्याचे प्रतिक्रिया भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केले.

3 जुलै रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी कार्यकारणी जाहिर केली असुन सदर कार्यकारणीत कोपरगाव मतदार संघाचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची प्रदेश सचिव पदासाठी निवड करण्यात आल्याबद्दल पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सोशल डीसटन्स ठेवुन सन्मान करण्यात आला. त्या म्हणाल्या, एकत्र येऊन स्थापन झालेले सरकार आहे. अपघाताने झालेले सरकार आहे. भाजपा युतीला जनमताचा कौल होता. पाठीत खंजीर खुपसुन वेगळ्या विचाराची मंडळी एकत्र आली आहे.

- Advertisement -

कोरोना सारख्या आजारामध्ये रुग्णसंख्याही वाढत आहे. दुर्दैवाने महाराष्टाचा साथीच्या आजारात एक नंबर आला आहे. कोरोनाच्या महाभंयकर संकटाच्या वेळी राज्य सरकार अपयशी ठरले. रुग्णांची हेळसांड, खाजगी दवाखान्यामध्ये होणारी आर्थिक लुट, कुठे व्हेंटीलेटर नाहीत तर कुठे टेस्ट वेळेवर होत नाही. अशाप्रकारची अतोनात हाल कोविडच्या रुग्णांची होत असल्यामुळे निश्चितच राज्य सरकारमुळेच सामान्य गोरगरीब जनतेला त्रास होत आहे.

पक्षाने माझी निवड करुन मला मोठी संधी दिली आहे. भाजप पक्षाला शिस्त आणि जनकल्याणाचा मोठा वारसा आहे. पक्षाची विचारधारा सर्व सामान्यपर्यंत पोहचली तर त्यातुन उद्याचा उज्वल महाराष्ट्र व भारताचे भवितव्य घडेल. पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम करणार असुन पक्षसंघटना जास्तीत जास्त मजबुत करण्यावर भर देणार असल्याचे सौ. कोल्हे म्हणाल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या