Saturday, April 27, 2024
Homeराजकीयउदासिन सरकारला मराठा समाज कदापी माफ करणार नाही - सौ. कोल्हे

उदासिन सरकारला मराठा समाज कदापी माफ करणार नाही – सौ. कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

राज्याच्या राजकारणात अनेक मराठा नेते आहे. बहुसंख्य मराठा समाजाचे आमदार सरकारमध्ये प्रतिनिधीत्व करत आहे.

- Advertisement -

मंत्रीपदेही भुषवित आहेत. परंतु मराठा आरक्षणाबाबत असलेल्या उदासिनतेमुळे ही नेते मंडळी मराठा समाजाला न्याय देण्याचे काम करू शकत नाही. या उदासीन सरकारला मराठा समाज कदापिही माफ करणार नाही, अशी प्रतिक्रीया भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या अनेक वर्षापासूनच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलने झाली. मोर्चे निघाले, या प्रश्नांची तीव्रता लक्षात घेउन मागील सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घेतला. माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विशेष लक्ष घालून मार्गी लावला.

उच्च न्यायालयात टिकेल, यादृष्टीने प्रयत्न केले आणि उच्चन्यायालयात टिकवलेही. ही वस्तुस्थिती जनतेसमोर आहे. परंतु या सरकारच्या काळात राज्यकर्तेंनी हा विषयाकडे गांभीर्याने पाहिले नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. फक्त आणि फक्त आघाडी सरकार हा प्रश्न व्यवस्थित हाताळू शकला नसल्यामुळे या परिणामाला मराठा समाजाला सामोरे जावे लागले आहे.

या प्रश्नी लक्ष घालून प्रामाणिकपणे प्रयत्न करणार्‍या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचेवर मात्र काही संकुचित विचाराच्या महाराष्ट्रातील नेते म्हणून मिरवणार्‍या मंडळींनी फडणवीस ब्राम्हण म्हणून त्यांच्याविपयी वातावरण कलुशित करण्याचा केवीलवाणा प्रयत्न केला.

जनतेचा कौल नसतांना सत्तेच्या खुर्चीसाठी जुगाड जमवून अपघाताने आलेले हे सरकार एकमेकांचे रूसवे फुगवे काढण्यात आणि अधिकार्‍यांच्या बदल्या करून आर्थिक सोयीचे निर्णय घेण्यात मग्न आहे. पोलीस भरती करून मराठा समाजाच्या युवकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम हे सरकार करीत असल्याचा आरोपही सौ.कोल्हे यांनी केला आहे

कोरोना सारख्या महाभयंकर संकटात महाराष्ट्रात अनेकांना मृत्युला सामोरे जावे लागत आहे. रूग्णांची हेळसांड सुरू आहे. बेड मिळत नाही. रूग्णांची परवड महाराष्ट्रात सुरू असतांना शासनाचे बेड आणि शेड उभारून कोरोना सेंटर उभारल्याचे नाटक केले. परंतु वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स तसेच व्हेंटीलेटर आदी व्यवस्था नसल्याने रूग्णांची होणारी परवड काही थांबायचे नाव घेेत नाही.

यातही भ्रष्टाचार म्हणजे मृतदेहाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे काम येथेही चालू आहे. कोविड सेंटर मध्ये जनतेची होणारी हाल, मृतदेहाची अदलाबदल होत असतांना याठिकाणीही महिलांवरील अत्याचार थांबले नाही. येथही महिला सुरक्षित राहिली नाही. सत्ता हव्यासापोटी आणि खुर्च्या टिकविण्याच्या नादात हे सरकार जनतेच्या प्रश्नाकडे आणि रूग्णांच्या व्यवस्थेकडे लक्ष देण्यास पुर्णपणे अपयशी ठरले असल्याची टीकाही सौ. कोल्हे यांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या