Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यास्मृती इराणींचा काँग्रेसवर घणाघात; म्हणाल्या,...

स्मृती इराणींचा काँग्रेसवर घणाघात; म्हणाल्या,…

दिल्ली | Delhi

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) ईडीसमोर हजर झाले.

- Advertisement -

राहुल गांधी हे गेल्या काही दिवसांपासून परदेशात होते. यामुळे त्यांनी ईडीकडे चौकशीची वेळ पुढे ढकलावी, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठ्या हालचाली सुरु झाल्या.

दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले. दरम्यान, काँग्रेस पक्षाने केलेल्या निदर्शनाचा भाजपकडून समाचार घेतला जात असून, आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. यातच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेसवर घणाघात आला आहे.

‘आज ईडीविरोधात काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहे. नवी दिल्लीत तुम्ही कार्यकर्ते, नेत्यांना आज बोलवले आहे. कारण गांधी यांची संपत्ती वाचवायची आहे,’ असा हल्लाबोल स्मृती इराणी यांनी गांधी कुटुंबीयांवर केला.

तसेच ‘२ हजार कोटी रुपये वाचवणे हा उद्देश आहे. सत्य राहुल गांधींच, ग्रह ही राहुल गांधींच, असा टोला त्यांना राहुल गांधींना लगावला. काँग्रेस पक्ष ९० कोटी रुपये एजीएलला कर्ज देते. ज्या पक्षाची स्थापना इंग्रजांनी केली, त्यांनी इंग्रजांवर टीका करु नये. यंग इंडियाने समाज सेवेचे काम केलेले नाही.’ असा टोला देखील त्यांनी लगावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या