देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकावली

jalgaon-digital
1 Min Read

पिंपरी चिंचवड | Pimpri Chinchwad

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पूर्णानगर (Purnanagar) येथे अटल बिहारी वाजपेयी उद्यानाच्या उद्घाटन समारंभाला आले होते. यावेळी गर्दीतून एका अज्ञाताने त्यांच्या गाडीवर चप्पर भिरकावल्याची घटना घडली आहे. या अज्ञाताचा पिंपरी-चिंचवड पोलीस शोध घेत आहेत.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन होणार होते. मात्र देवेंद्र फडणवीस पिंपरीत पोहोचताच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांचा सामना करावा लागला.

या घटनेबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशी कृती करणारे चिल्लर असतात. भाजपच्या (BJP) सत्तेत कशा प्रकारे चांगल्या पद्धतीची कामे होतात, हे येथे आल्यावर समजते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे, महापौरांचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो, असे त्यांनी म्हटले आहे.

त्यांच्या कार्यकाळात ते काहीच करु शकले नाहीत, आणि आमच्या पदाधिकाऱ्यांनी चांगले काम करुन दाखवले आहे, त्याबद्दल त्यांच्या मनात असुया आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *