शुभांगी पाटील नॉट रिचेबल : गिरीश महाजन म्हणाले, आमचा आणि त्यांचा संपर्क....

शुभांगी पाटील नॉट रिचेबल : गिरीश महाजन म्हणाले, आमचा आणि त्यांचा संपर्क....

नाशिक | Nashik

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत आणखी एक ट्विस्ट आला आहे. अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या आता नॉट रिचेबल आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्या निवडणुकीतून माघार घेतात की सरळ लढत देता हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे...

सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन काँग्रेस आणि महाविकास आघाडीला धक्का दिल्यानंतर महाविकास आघाडीने नवे डावपेच रचण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील या मातोश्रीवर आल्या होत्या. याठिकाणी झालेल्या बैठकीनंतर ठाकरे गटाने शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला होता.

शुभांगी पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे. याबाबत भाजपचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गिरीश महाजन म्हणाले की, यात खळबळजनक काय हे मला कळत नाही. अर्ज मागे घेण्याची वेळ आता तासाभरावर आहे. त्यामुळे उमेदवार कुठे आहे हा त्यांचा प्रश्न आहे. नॉटरिचेबल आहेत, यामध्ये खळबळजनक काहीच नाही.

शुभांगी पाटील नॉट रिचेबल : गिरीश महाजन म्हणाले, आमचा आणि त्यांचा संपर्क....
नाशिक पदवीधर निवडणुकीत नवा ट्विस्ट; काल ठाकरे गटाचा पाठिंबा अन् आज शुभांगी पाटील नॉट रिचेबल, चर्चांना उधाण

ते पुढे म्हणाले की, आमचा आणि त्यांचा संपर्कही नाही आणि संपर्क साधण्याचा प्रयत्नही केला गेला नाही. त्यांनी उभे राहावे किंवा अर्ज मागे घ्यावा तो त्यांचा प्रश्न आहे. पण आम्ही एबी फॉर्म दिलेला नाही, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील त्यानंतर आमचा उमेदवार जाहीर होईल.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com