श्रीगोंदा : निवड कार्यक्रम जाहीर न केल्यास उपोषण
राजकीय

श्रीगोंदा : निवड कार्यक्रम जाहीर न केल्यास उपोषण

श्रीगोंदा पालिकेच्या उपनगराध्यक्षांची निवड लांबणीवरच

Arvind Arkhade

श्रीगोंदा|तालुका प्रतिनिधी|Shrigonda

श्रीगोंदाचे उपनगराध्यक्ष या आसाराम उर्फ अशोक खेंडके यांनी दि. 9 जून 2020 रोजी पदाचा राजीनामा दिलेला असूूून दोन महिने पूर्ण होत आले तरी नवीन उपनगराध्यक्ष पदाचा निवड कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाने जाहीर केला नसल्याने राजीनामा दिलेले उपनगराध्यक्ष अशोक खेंडके यांनीच उपोषणाचा इशारा दिला असून तसे निवेदन दिले आहे.

श्रीगोंदा उपनगराध्यक्ष खेंडके यांनी राजीनामा देऊन तब्बल दोन महिने होत आले तरी नवीन उपनगराध्यक्ष पदाचा निवडीचा कार्यक्रम लावलेला नाही. कोव्हिडच्या काळात अहमदनगर महापालिका स्थायी समिती सदस्य निवड, जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, पं. स. सभापती, बाजार समिती सभापती, उपसभापती तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, नांदगाव व इतर नगरपालिका उपनगराध्यक्ष निवडणूक कार्यक्रम, 29 जुलै रोजी झालेल्या आहेत. या अनुषंगाने श्रीगोंदा नगरपरिषद उपनगराध्यक्ष पदाचा निवडीचा कार्यक्रम लावणे आवश्यक होते.

तसेच याबाबत समक्ष भेटून अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात येऊनही अद्यापपर्यंत निवडणूक शाखेने दखल घेतलेली नाही. श्रीगोंदा पालिकेत भाजपाचे पूर्ण बहुमत असून आम्हास श्रीगोंदा शहरातील विकास कामे व लोकांच्या अडचणी सोडविण्याकरिता श्रीगोंदा नगरपरिषदेमध्ये सद्यस्थितीत उपनगराध्यक्ष पद रिक्त असल्यामुळे काम करताना खुप अडचणी येत आहेत.

या पदाच्या निवडीत पक्षपातीपणा होत आहे. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीकरिता निवडणूक कार्यक्रम लवकर न लावल्यास आम्ही खालील सह्या करणारे सर्व नगरसेवक कोव्हिड- 19 विषाणूच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून शासनाच्या नियमानुसार 15 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय श्रीगोंदा येथील कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करणार आहोत, असे निवेदन राजीनामा दिलेले उपनगराध्यक्ष अशोक खेंडके यांनी दिले आहे. नगरसेवक शहाजी खेतमाळीस, रमेश लाढाणे यांच्या सह्या आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com