शिवसेनेसाठी आनंदवार्ता; ‘या’ ग्रामपंचायतीवर सेनेचा भगवा

jalgaon-digital
2 Min Read

सोलापूर | Solapur

शिवसेनेतून ४० शिवसेना आमदारांनी (40 Shivsena rebel mla) बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसलेला होता. उद्धव ठाकरे (shivsena chief udhav thackeray) आणि एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) असे दोन गट शिवसेनेत पडले. यामुळे निवडणुकांमध्ये सेनेची मोठी अडचण होईल असे बोलले जात होते. मात्र, सोलापुरातून चांगली बातमी उद्धव ठाकरे गटाला आली असून एका ग्रामपंचायतमध्ये सातच्या सात सदस्य शिवसेनेचे निवडून आले आहेत….

शिवसेनेच्या उद्धव ठाकरे(shivsena chief udhav thackeray) गटासाठी सोलापूर दक्षिण तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायत येथून ही आनंदवार्ता आली आहे. दक्षिण सोलापूर तालुका युवासेना प्रमुख धर्मराज बगले (Dharmraj Bagale) यांनी चिंचपूर ग्रामपंचायतीवर (Chinchpur Grampanchayat) भगवा फडकवल्याने बगले याठिकाणी किंगमेकर ठरले आहेत.

भाजप आमदार आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख (subhash deshmukh) यांच्या गटाला झटका देत उद्धव ठाकरे (shivsena chief udhav thackeray) गटाने झेंडा फडकवल्याने सेनेचा भगवा याठिकाणी डौलाने फडकला आहे. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पहिल्याच निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला बोलबाला पाहायला मिळाल्याने शिंदे गटाला धक्का मानला जात आहे.

तिकडे बार्शी तालुक्यातील (Barshi Taluka) दोन्ही ग्रामपंचायतीवर मात्र राऊत गटाने झेंडा फडकवला. बार्शीचे भाजप समर्थक अपक्ष आमदार राजेंद्र राऊत (MLA Rajendra Raut) यांच्या गटाचा याठिकाणी विजय झाला. तर माजी आमदार दिलीप सोपल (MLA Dilip Sopal) यांच्या गटाचा पराभव झाला आहे. पानगाव ग्रामपंचायतीमध्ये (Pangaon Grampanchayat) राऊत गटाचे 11 तर सोपल गटाचे 4 सदस्य विजयी झाले आहेत. तर वांगरवाडी-तावरवाडी ग्रामपंचायतीत सातही जागांवर राऊत गटाचा विजय झाला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *