Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेनेकडून मालेगाव, नांदगावात चाचपणी; दादा भुसे, सुहास कांदेंना शोधणार पर्याय

शिवसेनेकडून मालेगाव, नांदगावात चाचपणी; दादा भुसे, सुहास कांदेंना शोधणार पर्याय

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सरकार कोसळल्यानंतर शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेनेच्या बळकटीसाठी जोमाने प्रयत्नशील आहेत…

- Advertisement -

शिवसेना भवन (Shivsena Bhavan) येथे बैठकांचा सपाटा सुरूच आहे. आता ठाकरे यांनी पक्ष बांधणीवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दादा भुसे (Dada Bhuse) आणि सुहास कांदे (Suhas Kande) यांच्याबाबत महत्वपूर्ण आदेश शिवसैनिकांना दिले आहेत.

शिवसेना बंडखोरांविरोधात आता ठाकरे शिवसेना (Shivsena) आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या 40 बंडखोर मंत्री आणि आमदारांच्या जागेवर पर्यायी आणि सशक्त उमेदवारांना शोध करा, मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ द्या, असे आदेश शिवसैनिकांना देण्यात आले आहेत. नाशिक जिल्ह्यात दादा भुसे (Dada Bhuse) आणि सुहास कांदे (Suhas Kande) यांना पर्याय शोधा, असे आदेश ठाकरे यांनी दिल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या