काल आज अन् उद्या! शिवसेना-मनसेत 'बॅनर'वॉर

काल आज अन् उद्या! शिवसेना-मनसेत 'बॅनर'वॉर

मुंबई | Mumbai

राज ठाकरे (raj thackeray) यांनी ठाण्यात (thane) झालेल्या उत्तरसभेत (uttarsabha) मशीदीवरील भोंग्यावरुन इशारा दिला होता. ३ मेपूर्वी म्हणजेच ईदच्या (eid) आधी मशीदीवरील भोंगे उतरवले गेले पाहिजेत....

तसं न झाल्यास हनुमान चालिसा (hanuman chalisa) वाजवली जाईल, हनुमान चालिसाने नाही झालं तर पुढचंही ठरलेलं आहे, माझ्या भात्यातला तो पुढचा बाण अजून मी काढलेला नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. राज ठाकरे यांच्या याच भूमिकेवरुन मनसेला (MNS) डिवचण्यात आलं होत.

काल आज अन् उद्या! शिवसेना-मनसेत 'बॅनर'वॉर
आलिया-रणबीरच्या विवाहसोहळ्याचे फोटो पाहिलेत का?

काल आज उद्या, अशा मथळ्याखाली लावण्यात आलेल्या या बॅनरवर राज ठाकरे यांचा मुस्लीम वेषातील फोटो, त्याच्यापुढे हनुमान चालिसा, असे लिहण्यात आले होते. त्यानंतर आता उद्या राज ठाकरे यूटर्न मारून कोणती नवी भूमिका घेणार, असा खोचक प्रश्न या बॅनरच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला होता. या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आता याला मनसेनेही 'काल आज उद्या' या थीमवर बॅनर तयार करत शिवसेनेला (Shivsena) चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काल उद्धव ठाकरे हे बाळासाहेब यांच्यासोबत होते. तर आज उद्धव ठाकरे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सोबत आहेत आणि उद्या कोणा सोबत अशा आशयाचा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.