Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यालोकसभेच्या जिंकलेल्या सर्व १८ जागा लढवणार अन् जिंकणार, संजय राऊतांचा दावा

लोकसभेच्या जिंकलेल्या सर्व १८ जागा लढवणार अन् जिंकणार, संजय राऊतांचा दावा

मुंबई | Mumbai

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे नेहमी त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. संजय राऊत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवरुन त्यांनी भाष्य केलं आहे. आगामी लोकसभेत शिवसेना ठाकरे गटाचे १९ खासदार लोकसभेत दिसतील, असा दावा संजय राऊत यांनी केला. यामुळे राज्यात ठाकरे गटाने जिंकलेल्या सर्व १८ जागा ते लढवणार असून इतर काही जागांवरही दावा करणार असल्याचे संकेत संजय राऊत यांनी दिले.

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, पवार साहेबांच्या नेतृत्वात बैठक आम्ही घेतली आणि १६-१६ चा फॉर्म्युला ठरला ही बातमी तुम्ही आम्हाला देताय. जे आम्हाला माहीत नाही. बैठकीत जे काही ठरलंय, त्याबाबतची बाहेर आलेली माहिती ही चुकीची आहे. तुम्हाला कोण ही माहिती देतं आणि तुम्ही त्यानुसार त्या बातम्या देता, हे मला माहीत नाही. पण असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, असेही राऊतांकडून स्पष्ट करण्यात आले.

भीषण अपघात! वीटाने भरलेल्या ट्रॅक्टरची कारला धडक; एकाच कुटूंबातील ५ जणांचा मृत्यू

लोकसभा जागा वाटपासंदर्भात आता प्राथमिक चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात कोणी बैठका घ्याव्यात, कोणत्या विषयाला धरून घ्याव्यात, याबाबतची चर्चा बैठकीत झाली असल्याची माहिती राऊतांनी दिली. पण आकड्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. पण पत्रकार नवीन आकडा देत आहेत, त्याचे स्वागत आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे आणि राहिल. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या महाविकास आघाडीच्या वज्रमुठीनेच लढवल्या जातील. याबाबत या बेकायदेशीर सरकारने काहीही म्हणू दे. आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत आणि होणारही नाहीत. एकत्र राहूनच सध्याच्या घटनाबाह्य सरकारला घालवू, असे राऊतांकडून यावेळी सांगण्यात आले.

गौतमी पाटीलने चक्क स्टेजवरून खाली येत प्रेक्षकांसोबत धरला ठेका, पाहा VIDEO

तसेच, २०१९ मध्ये महाराष्ट्रात जिंकलेल्या १८ जागा शिवसेनेकडे राहणार आहे. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचा विजय होईल अन् पुढील लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे महाराष्ट्रातील १८ आणि दादरा नगर हवेलीतील एक असे सर्व १९ जण निवडून येतील, असा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेला आहे. तर जिंकलेल्या जागा या त्यांच्याकडेच राहतात, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या