निवडणूक आयोगाच्या 'त्या' निर्देशाविरुद्ध शिवसेना सर्वोच्च न्यायालयात

निवडणूक आयोगाच्या 'त्या' निर्देशाविरुद्ध शिवसेना सर्वोच्च न्यायालयात

मुंबई | Mumbai

शिवसेना (Shivsena) कोणाची? शिंदे (Eknath Shinde) की ठाकरे(Uddhav Thackeray)? यावर सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) घटनापीठ स्थापन करण्याचा विचार करत आहे, तर दुसरीकडे शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह कुणाचे? याप्रकरणी निवडणूक आयोगाने (Election Commission) दोन्ही गटांना सुनावणीसाठी नोटीस बजावली आहे.

निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाला ८ ऑगस्टपर्यंत या दाव्याबाबतची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. दरम्यान आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने शिंदे गटाच्या याच मागणीविरोधात मोठं पाऊल उचललं आहे.

ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका सादर केली आहे. या याचिकेत ठाकरे गटाने एकनाथ शिंदे गटाच्या मागणीवरून निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या कार्यवाहीला स्थगिती देण्याची मागणी केलीय.

या प्रकरणातील याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहेत. त्यामुळे निवडणूक आयोग यावर कार्यवाही करू शकत नाही, असा युक्तिवाद ठाकरे गटाच्या याचिकेत करण्यात आला आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमाशी बोलताना थेट भाष्य टाळले, पण प्रत्येकाला लोकशाहीत न्यायालयाचे दरवाजे उघडे असतात, त्यांना दाद मागण्याचा अधिकार आहेत. त्यावर मला काही बोलायचे नाही असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com