“शिवसैनिकांच्या रक्ताच्या थेंबाचा हिशोब...”; संजय राऊतांचा थेट इशारा

संजय राऊत
संजय राऊत

मुंबई | Mumbai

आज खासदार संजय राऊत यांचा 63 वा वाढदिवस आहे. दरम्यान राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि विरोधकांवर तुफान फटकेबाजी करत इशारा दिला आहे.

काल ठाण्यात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. त्यावर बोलतांना राऊत म्हणाले की, 'नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांच्या जिल्ह्यातही शिवसैनिकांवर असे हल्ले झाले. मात्र, आज राणेंची स्थिती काय आहे. याऊलट त्यांच्याच जिल्ह्यात शिवसेना अजूनही कायम आहे. ठाण्यातसुद्धा अशीच घटना घडली आहे. आज त्यांच्याकडे सत्ता, पोलिस यंत्रणा, पैशांची ताकद आहे. त्यामुळे शिवसैनिकांवर हल्ले करत आहे. मात्र, शिवसैनिकांचे रक्त स्वस्त नाही. ज्यांनी ज्यांनी गेल्या ५० वर्षांत शिवसैनिकांचे रक्त सांडवले, ते महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार झाले आहेत. या सर्वांचा हिशोब त्यांना द्यावा लागला आहे.'

राज्यातलं वातावरण सध्या गढूळ झालं आहे. आव्हाडांवर खोटी प्रकरणं सुरू आहे. अशाने राज्य कुठे चाललंय हे दिसत आहे. हे सारं थांबायला हवे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी अजित पवार आणि उद्धव ठाकरेंचा फोन आला होता, अशी माहितीही त्यांनी दिली आहे. नवाब मलिक, अनिल देशमुख सगळेच बाहेर येतील. चुकीच्या कारवाईबद्दल कोर्टाचे हातोडे पडत आहेत. लवकरच संपूर्ण आकाश निरभ्र होईल, अशी आशाही राऊतांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com