
मुंबई | Mumbai
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची धाड पडली आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांचं पथक सकाळी ७ च्या सुमारास संजय राऊतांच्या मुंबईतील घरी सीआरपीएफ जवानांच्या सुरक्षेसह दाखल झालं.
गेल्या ६ तासांपासून राऊत यांची चौकशी सुरू आहे. पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी ईडीकडून चौकशी केली जात आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार संजय राऊत यांच्या दादरमधल्या घरातही ईडीने छापा टाकला आहे.
तसेच ईडी कार्यालयाबाहेरच्या हालचाली वाढल्याने राऊत यांना अटक होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान नवनीत राणा आणि शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी एवढी मोठी ईडी धाड पडल्यावर १०१ टक्के अटक होणार असा दावा केला आहे.