अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं ही आमची चूक होती; संजय राऊतांचं मोठ विधान

अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं ही आमची चूक होती; संजय राऊतांचं मोठ विधान

नागपूर | Nagpur

राज्याचे माजी गृहमंत्री (Former Home Minister) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा राजीनामा घेणे, ही चूक होती, असा खुलासा शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

तसेच अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या राजीनाम्याचा निर्णय घाईघाईत घेण्यात आला. हे प्रकरण संयमाने हाताळले पाहिजे होते. पण आता आम्ही नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेणार नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले. ते मंगळवारी नागपूरमध्ये (Nagpur) पत्रकारपरिषदेत बोलत होते.

केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigation Agency) हा खुळखुळा झाला आहे. जिथे भाजपचे (BJP) सत्ता नाही त्या राज्यांमध्ये ईडीच्या (ED) कारवाया होत आहेत. मीदेखील एक पीडित असून माझ्या कुटुंबीयांवरही आरोप करण्यात आले, असल्याची टीकाही राऊत यांनी केली आहे.

तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांचे मागच्या काही वर्षात मुस्लिम समाजाबद्दल जे वक्तव्य केले आणि संघाने स्वत: मुस्लीम समाजासाठी राष्ट्रीय मुस्लिम विचार मंचची स्थापना केली. त्यामुळे पडळकर किंवा भाजप नेते ­­मोहन भागवत यांना जनाब म्हणून उल्लेख करतील का? असा परखड सवाल संजय राऊत यांनी केला.

दरम्यान राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या तुरुंगात आहेत. मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील अधिकारी सचिन वाझेकडून (Sachin Waze) १०० कोटींच्या वसुली प्रकरणी अनिल देशमुखांवर ईडीने ही कारवाई केली आहे. महाविकास आघाडी सरकारने (MVA Govt) अनिल देशमुखांचा राजीनामा घेऊन गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिलीप वळसे-पाटलांकडे (Dilip Walse Patil) सोपलवली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com