Tuesday, April 23, 2024
Homeराजकीय'तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आलात, तेव्हा...'; संजय राऊतांचा चंद्रकांतदादांना टोला

‘तुम्ही कोल्हापूर सोडून कोथरुडला आलात, तेव्हा…’; संजय राऊतांचा चंद्रकांतदादांना टोला

मुंबई | Mumbai

मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Election) संजय राऊतांनी (Sanjay Raut) निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज काल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांनी संजय राऊत यांना दिलं होतं. चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या एका खुल्या आव्हानाला शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

- Advertisement -

“राजकीय पतंगबाजीसाठी आतुर असलेल्या पतंगबाजांनी आपले पतंग उडवण्यास…”; रोहित पवारांचा भाजपवर हल्ला

‘मी काय करावं हा प्रश्न येतो कुठे? त्यांनी त्यांचं पहावं, माझ्याकडून त्रास होत आहे मान्य आहे. पण अशाही परिस्थितीत माझ्या पक्षाने मला जबाबदारी दिली, तिकडे मी असणारच आणि ती नेटाने पार पाडणार. तुम्ही विधानसभा निवडणुकीला कोल्हापूर सोडून कोथरुडला आले, आम्ही तुम्हाला काही बोललो का? आम्ही आमचं बघू, तुम्ही तुमच बघा,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

दरम्यान, ‘स्वत:ला गाव राखता आलं नाही अन् संजय राऊतांना कसलं आव्हान देताय; अशी खोचक टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP leader Chandrakant Patil) यांच्यावर केली आहे. शरद पवार यांच्याबाबत चंद्रकांत पाटील बोलतात हे आक्षेपार्ह आहे. पाटील यांना कोल्हापुरात जागा मिळाली नाही. अन् पवारांना माढामधून मागे घालवल्याचे बोलतात. येत्या काळात असं बोलणं आम्ही सहन करणार नाही, असा इशारा देतानाच स्वत:चं गाव राखता आलं नाही आणि संजय राऊत यांना कशाला आव्हान देता?, असा सवाल मुश्रीफ यांनी केला.

चंद्रकांत पाटील ‘राज’दरबारी; राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण

काल मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना निवडणूक लढण्याचं आव्हान दिलं. एकदा संजय राऊत यांनी मुंबई महापालिकेत एक सेफ जागा निवडणूक लढून जिंकून येऊन दाखवावे त्यांनी त्यांचे दंड ही थोपटून पहावे आणि ताकद ही पाहावी, असं म्हटलं होतं.

- Advertisment -

ताज्या बातम्या