Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याशिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह गेलं... शिवसेना भवनाचं काय?; राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह गेलं… शिवसेना भवनाचं काय?; राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

मुंबई | Mumbai

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना नाव, धनुष्यबाण हातातून निसटलं आहे. त्यामुळे ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

- Advertisement -

त्यानंतर आता ठाकरे गटाकडून शिवसेना भवन जाणार का, अशी चर्चा आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. यावर आता खासदार संजय राऊत यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; ‘मातोश्री’वर बोलावली तातडीची बैठक

संजय राऊत म्हणाले, ‘उद्धव ठाकरेच आमचे शिवसेनाप्रमुख आहेत. तेच माझे सेनापती आहेत. तेच आमचे शिवसेनाप्रमुख आहेत. हे निवडणूक आयोग ठरवणार नाही, हे दुसरं कोणीही ठरवणार नाही. त्यांची नेमणूक बाळासाहेब ठाकरे हयात असताना झालेली आहे. आम्ही सगळ्यांनी यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. कोण शिंदे गट त्यांनी स्वतःचं पहावं. त्यांनी स्वतःला ब्रिगेडिअर, जनरल किंवा एअर व्हाईस मार्शल म्हणून जाहीर कराव.’

तसेच, ‘शिवसेनाच्या शाखा, शिवसेना भवन इथं जे शिवसेनेचं नाव आहे ते तसंच राहणार का? या प्रश्नावर राऊत म्हणाले, ‘निवडणूक आयोगानं शेण खाल्लं म्हणून आमच्या शाखा त्या दिशेनं जाणार नाहीत. शाखा आणि शिवसैनिक तिथेच बसतील आणि शिवसेनेची शाखा म्हणूनचं काम करतील. शिवसेना भवनाचं काहीही होणार नाही. पक्ष आमचाच आहे. शिवसेनाभवनासह शिवसेनेचा शाखा आणि हजारो शिवसैनिक आमच्याबरोबच राहणार आहेत.’ असं राऊत म्हणाले.

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; टायर फुटला, कार दुभाजकावर आदळली, एअर बॅग उघडले पण…

यावेळी बोलतांना संजय राऊत एकनाथ शिंदेंना उद्देशून म्हणाले, ‘रावणाला धनुष्यबाण पेलवणार नाही. ते धनुष्यबाण रावणाच्या छाताडावर पडेल. शिंदे गटाचे आमदार हे आमिषाला बळी पडून बाहेर पडले आहेत. त्यामुळे शिवसेना हा पक्ष त्यांच्या मालकीचा कसा? निवडणूक आयोगाचा हा निर्णय सर्व कायदे पायदळी तुडवून दिला आहे. याविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाला जाब विचारणे गरजेचे आहे.’

इतिहासात भोपळा, कलेत मात्र १००…; मार्कशीट व्हायरल करत राष्ट्रवादीनं कोश्यारींना डिवचलं

तसेच यावेळी त्यांनी नारायण राणेंना देखील टोला लगावला. ‘सकाळी वृत्तपत्रात जल्लोष करत असल्याचं पाहिलं. फोटोत मोजून सात चेहरे होते आणि त्यामध्ये एक अब्दुल्ला नाचत होता. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. जे शिवसेना आधीच सोडून गेले आहेत ते काल शिंदे गटाबरोबर फटाके फोडत नाचत होते. असे अब्दुल्ला घेऊन शिवसेना वाढणार आहे का?’ असं म्हणत त्यांनी राणेंवर निशाणा साधला.

दोघा अल्पवयीन मुलींना पळवून नेणारे दोघे जेरबंद

- Advertisment -

ताज्या बातम्या