Saturday, April 27, 2024
Homeराजकीयकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर संजय राऊत यांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले...

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर संजय राऊत यांची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दुसऱ्या कार्य काळाच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Union Cabinet Expansion) बुधवारी पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात १५ कॅबिनेट आणि २८ राज्यमंत्र्यांसह एकूण ४३ मंत्र्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

- Advertisement -

Modi Cabinet Expansion : जाणून घ्या, मोदींच्या नव्या मंत्री मंडळात वर्णी लागलेल्या महाराष्ट्रातील चार खासदारांबद्दल

राज्यातील चार खासदारांना (Maharashtra MP) केंद्रात मंत्रिपद (Central Ministry) देण्यात आलं. यामध्ये नारायण राणे (Narayan Rane), भारती पवार (Dr Bharti Pawar), कपिल पाटील (Kapil Patil) आणि भागवत कराड (Dr Bhagwat Karad) यांचा समावेश आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळावर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी म्हंटल आहे की, ‘भाजपाने (BJP) शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीचे (NCP) आभार मानले पाहिजेत. आमच्याकडून जो पुरवठा झाला आहे त्यामुळेच महाराष्ट्रातून मंत्रीमंडळात चेहरे मिळाले आहेत. कपिल पाटील हे राष्ट्रवादीचं प्रॉडक्ट (Product) आहे. भारती पवार या पूर्णपणे राष्ट्रवादीचं प्रोडक्शन (Production) आहे. नारायण राणे हे शिवसेना, काँग्रेस (Congress) करत भाजपात गेले आहेत. मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा शिवेसना राष्ट्रवादीचाच आहे,’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

त्याचबरोबर, ‘अनेक जुन्या जाणत्या नेत्यांना बाजूला ठेवून मोदी सरकारने नव्या चेहऱ्यांना जबाबदारी दिली आहे. अर्थात त्यांची क्षमता पाहूनच त्यांना जबाबदारी दिली आहे. या मंत्र्यांनी आता महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान द्यावं. मधल्या काळात लहान उद्योग मरून पडला होता. त्याला संजीवनी देण्याचं आव्हान राणेंसमोर आहे. रोजगार निर्मितीचं काम त्यांच्या पुढे आहे. हा व्यक्तिगत टीका टिप्पणीचा विषय नाही. राणे चांगले काम करतील. ते महाराष्ट्रात उद्योग आणतील असा विश्वास आहे, असंही राऊत म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या