शिवबंधन बांधा आणि उमेदवारी मिळवा; राज्यसभेसाठी संभाजीराजेंना शिवसेनेकडून 'ओपन ऑफर'

शिवबंधन बांधा आणि उमेदवारी मिळवा; राज्यसभेसाठी संभाजीराजेंना शिवसेनेकडून 'ओपन ऑफर'

मुंबई । Mumbai

राज्यसभेच्या (Rajya Sabha) सहा जागांसाठी होणारी निवडणूक चुरशीची बनली आहे. या निवडणुकीत शिवसेनेने (Shivsena) आणखी एक जागा लढविण्याचाही निर्णय घेतला आहे. तर, संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपण अर्ज दाखल करणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.

दरम्यान, राज्यसभेसाठी सहावा उमेदवार शिवसेनेचाच असेल. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची उमेदवारी स्विकारुन निवडणूक लढवावी, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेसाठी उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आज पहिल्यांदाच यासंदर्भात संजय राऊतांनी उघडपणे भाष्य केलं. त्यामुळे आता संभाजीराजे छत्रपती शिवसेनेनं दिलेली ऑफिर स्विकारणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांशी अनेक विषयांवर चर्चा झाली, राज्यसभेची सहावी जागा ही शिवसेनेची असल्याचे मुख्यमंत्र्यांचे मत आहे. शिवसेनेच्या उमेदवाराने निवडणूक लढवावी, संभाजीराजेंनी शिवसेनी उमेदवारी स्वीकारून निवडणूक लढवावी, त्यांनी ऑफर नाकारल्यास मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील.'

तसेच, छत्रपती संभाजीराजे हे देखील आमचेच आहे, त्यांचे आणि आमचे एक नाते आहे त्यामुळे आम्ही त्यांना एक विनंती केली आहे की, तुम्हाला जर ही निवडणूक लढवायची असेल तर, आपण शिवसेनेत पक्षप्रवेश करा त्यानंतर मुख्यमंत्री त्यासंदर्भात निर्णय घेतील. यामध्ये कोणाच्या भावना दुखावण्याचा प्रश्नच येत नाही,' असे संजय राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com