“बंटी-बबली मुंबईत, आम्हाला...”; राणा दांपत्यावर संजय राऊतांची जोरदार टीका

“बंटी-बबली मुंबईत, आम्हाला...”; राणा दांपत्यावर संजय राऊतांची जोरदार टीका

नागपूर | Nagpur

नवनीत राणा (MP Navneet Rana) आणि रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी २३ एप्रिलला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर (Matoshree) जाऊन हनुमान चालीसा पठणाचा (Hanuman Chalisa) निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. गनिमी कावा करत नवनीत राणा आणि रवी राणा विमानाने मुंबईत दाखल झाले आहेत. मुंबईत (Mumbai) ते गुपचूप आले आहेत.

दरम्यान शिवसेना (Shivsena) प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राणा दांपत्यावर जोरदार टीका केली आहे. 'बंटी आणि बबली पोहोचलेच आहेत तर आम्हाला काही अडचण नाहीये. हे फिल्मी लोक आहेत, ही स्टंटबाजी आहे. मार्केटिंग करणं हेच यांचं काम आहे. भाजपाला (BJP) आता मार्केटिंगसाठी अशा लोकांची गरज पडत आहे. हिंदुत्वाचं मार्केटिंग करण्याची गरज नाही, आम्हाला हिंदुत्व म्हणजे काय हे माहित आहे'. असं संजय राऊत म्हणाले.

तसेच, 'राम जयंती साजरी करणे व हनुमान चालिसा म्हण्णे हे धार्मिक आणि श्रद्धेचे विषय आहेत. मात्र भाजपकडून सी ग्रेड अ‍ॅक्टर्सच्या मदतीने यावर केवळ नौटंकी सुरू आहे. हिंदुत्वाच्या नावावर भाजपकडून सध्या देशभरात जे वातावरण तापवले जात आहे. त्यातील हे दोघे पात्र आहेत. अशा पात्रांना लोक गांभीर्याने घेत नाही, असे संजय राऊत म्हणाले.

Related Stories

No stories found.