Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याराज ठाकरेंना संजय राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले,...

राज ठाकरेंना संजय राऊतांचे प्रत्युत्तर; म्हणाले,…

मुंबई । Mumbai

मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांची तोफ आज पुण्यात (Pune) धडाडली. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात राज ठाकरेंची सभा पार पडली.

- Advertisement -

यावेळी राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारवर आणि प्रामुख्याने शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेनेवर (Shiv Sena) टीका केली आहे. राज ठाकरेंच्या शिवसेनेवरील टीकेला संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘आमच्या हिंदूत्वावर कोणी प्रश्न उपस्थित करू शकत नाही. सर्वात आधी आपल्या पक्षाबद्दल बोलावे. राज ठाकरेंनी शिवसेनवर बोलू नये. आता भगवी शाल पांघरल्याने राज ठाकरे हिंदुत्ववादी होत नाही,’ अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली.

तसेच, ‘बाळासाहेबांची क्रेडिबिलेटी आहे म्हणून हा पक्ष पन्नास वर्ष टीकून आहे. औरंगाबादचं संभाजीनगर झालंच पाहिजे, आणि ते केलेले आहे, म्हणून तर राज ठाकरे त्याला संभाजीनगर म्हणतायत. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळीच सांगितले होतं, कागदोपत्रीही झाले आहे, केंद्राकडे प्रस्ताव आहे ते मंजूर करतील.’ असं ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या