Saturday, April 27, 2024
Homeराजकीय'आ देखे जरा किसमें कितना है दम..', ED च्या नोटीसनंतर संजय राऊतांचे...

‘आ देखे जरा किसमें कितना है दम..’, ED च्या नोटीसनंतर संजय राऊतांचे आव्हान

मुंबई l Mumbai

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने (ED) नोटीस पाठवली आहे. येत्या २९ तारखेला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे. आता संजय राऊत यांनी केलेलं ट्वीट चर्चेत आहेत. संजय राऊत यांनी ट्वीट करत ईडी आणि केंद्र सरकारला एक प्रकारे आव्हान दिलं आहे.

- Advertisement -

संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं की, आ देखे जरा किसमे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथीया. वर्षा राऊत यांना नोटीसीच्या बातम्यांनंतर संजय राऊत यांनी ट्वीट केल्याने त्यांनी एकप्रकारे आव्हानच दिलं आहे.

तसेच प्रसारमाध्यमांशी बोलतांना राऊत म्हणाले की, “मी काही सांगत नसून सगळं भाजपाचे लोक सांगत आहेत. भाजपाचे लोक मला ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत. कालपासून पाहतोय अजून कोणी आलेलं नाही. मी माझा माणूस भाजपाच्या कार्यालयात पाठवला आहे. कदाचित तिथे नोटीस अडकली असेल. तिथून त्यांच्या पक्षाचा माणूस निघाला असेल…तर पाहून घेऊ,” असा टोला त्यांनी लगावला आहे. “हे सगळं राजकारण असून ज्यांना करायचं आहे ते करु शकतात,” असंही संजय राऊत यांना यावेळी सांगितलं. “मी दोन वाजता शिवसेना भवनात बोलणार आहे,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत यांच्या खात्यात प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही प्रकारचे व्यवहार झाले आहेत. हा व्यवहार कसा झाला? त्यामागील कारण काय आहे? हे ईडीला जाणून घ्यायचे आहे. वर्षा राऊत यांना संपूर्ण माहिती गोळा करण्यासाठी बोलावण्यात आले आहे, अशी माहिती मिळत आहे.

दरम्यान, एकनाथ खडसे यांना ईडी नोटीस आल्यानंतर संजय राऊत आपली प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, ते म्हणाले होते की, आमच्या शिवसेनेच्या नेत्यांनाही ‘ईडी’च्या नोटिसा आल्या आहेत. जे तुमच्या विरोधामध्ये आहेत, तुम्ही ज्यांच्याशी राजकीय सामना करू शकत नाहीत, अशा लोकांना तुम्ही ‘ईडी’, ‘सीबीआय’, ‘इन्कम टॅक्स’ अशा बळाचा वापर करून नमवण्याचा प्रयत्न करीत असाल, तर ते होणार नाही,’ असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या