Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्यानारायण राणेंना बाईन पाडलं... बाईनं...!; संजय राऊतांकडून अजितदादांचा VIDEO ट्विट

नारायण राणेंना बाईन पाडलं… बाईनं…!; संजय राऊतांकडून अजितदादांचा VIDEO ट्विट

मुंबई | Mumbai

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमुळे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाला उधाण आलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

- Advertisement -

शिंदे गटाकडून संजय राऊतांना लक्ष्य केलं जात असून त्यांच्यावर होणार्या टीका-टिप्पणीवर राऊतही प्रत्युत्तर देत आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या एका भाषणातील व्हिडिओ ट्विट करत संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये अजित पवारांना ‘कमाल की चीज’ असा उल्लेख केला आहे. तसेच, नेता असाच असतो असंही राऊत म्हणाले आहेत. “दादा म्हणजे कमाल की चीज! नेता असाच असतो, एकदम मोकळाढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश! जय महाराष्ट्र”, असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे.

अजित पवार व्हिडिओत नेमकं काय म्हणतात?

सध्याच्या शिवसेना फुटीबीबाबत भाष्य करताना अजित पवार म्हणतात कि, ज्यांनी ज्यांनी शिवसेना फोडली ते सर्व निवडणुकीत पडले. अगदी छगन भुजबळ यांच्यापासून ते नारायण राणे यांच्यापर्यंत सर्व नेते निवडणुकीत पडले. नारायण राणे तर २ वेळा पडले. एकदा कोकणात आणि दुसऱ्यांदा मुंबईतील विधानसदभ निवडणुकीत पडले. त्यावेळी तर एका महिलेने त्यांना पाडलं. बाईनं पाडलं बाईनं असं आपल्या खास रांगड्या शब्दात अजित पवारांनी राणेंचा समाचार घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या