ठाकरेंना पुन्हा धक्का! विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला

ठाकरेंना पुन्हा धक्का! विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटाने घेतला

मुंबई | Mumbai

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गट अधिकच आक्रमक झाला आहे. आज शिंदे गटाच्या आमदारांनी विधिमंडळात दाखल होत शिवसेनेच्या कार्यालयाचा ताबा घेतला आहे. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांच्यासह अनेक आमदार विधिमंडळातील कार्यालयात ठाण मांडून बसले आहेत.

याआधी ठाकरे गटाचा या कार्यलयावर ताबा होता. इथे असलेले बोर्ड आणि बॅनर हटवण्यात आले. त्यानंतर भरत गोगावले यांनी आमदारांसह या कार्यालयावर ताबा घेत म्हटलं की आता शिवसेना हा आमचा पक्ष आहे. यापुढे इतर कार्यलयं ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com