शिंदे गट पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

शिंदे गट पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेना पक्षावर नेमका अधिकार कुणाचा असा प्रश्न निर्माण झाला.

कारण शिंदे गटाने शिवसेना आमचीच आणि धनुष्यबाणही आमचाच असा दावा केला. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) स्थापन केलेल्या शिवसेनेचं भविष्य काय पक्षावर नेमका कुणाचा अधिकार असा प्रश्न विचारला जाऊ लागला. हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे.

अश्यातच शिवसेना (shivsena) आणि शिंदे गटामध्ये (shinde group) सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला आता नवीन वळण मिळणार आहे. शिंदे गटाने आता सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) रिट याचिका दाखल केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवावी, निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये, निवडणूक आयोग प्रक्रियेसंदर्भात निर्णय द्यावा, अशी विनंती शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.

येत्या कालावधीत राज्यात महापालिका निवडणूका आहेत. शिवाय अंधेरी पूर्वमध्ये शिवसेनेचे रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे पोटनिवडणूक होणार आहे. त्याअगोदरच शिवसेना चिन्ह आणि पक्षाचा निकाल लावाणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं तात्काळ सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवण्याबाबत स्पष्टता करावी. अशी विनंती शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com