Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यासंभाजीराजेंचा विषयच संपला; राजघराण्याला राजकीय पक्षाचे वावडे कशाला?

संभाजीराजेंचा विषयच संपला; राजघराण्याला राजकीय पक्षाचे वावडे कशाला?

मुंबई । Mumbai

गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांच्या राज्यसभा (Rajya Sabha Election) उमेदवारीवरून राजकारण चांगलंच तापलेले आहे. त्यातच राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून कोल्हापूरचे संजय पवार (Sanjay Pawar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यावर संभाजीराजे समर्थकांनी आमच्यासोबत दगाफटका झाल्याचा आरोप केला आहे…

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) आणि शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) हेच याला कारणीभूत असल्याचे सांगत मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी संताप व्यक्त केला. यावर संजय राऊत यांनी हे आरोप फेटाळले असून संभाजीराजे छत्रपती यांच्या उमेदवारीबद्दल नेमक्या काय घडामोडी घडल्या याविषयी भूमिका मांडली आहे.

यावेळी बोलतांना संजय राऊत म्हणाले की, आमच्यासाठी संभाजीराजेंचा विषय संपला आहे. आम्ही संभाजीराजेंना शिवसेनेची (Shivsena) ४२ मते देण्यासाठी तयार होतो. ही जागा शिवसेनेची आहे, तुम्ही शिवसेनेचे उमेदवार व्हा ही आमची अट नव्हती तर भूमिका होती. छत्रपती किंवा राजघराण्याला राजकीय पक्षाचे वावडे नसावे.

मोठ्या महाराजांनी शिवसेनेत, काँग्रेसमध्ये (Congress) प्रवेश केला होता. मालोजीराजे (Maloji Raje Chhatrapati) स्वत: संभाजीराजे राष्ट्रवादी (NCP) भाजपा (BJP) आदी पक्षांकडून निवडणुका लढले आहेत. आमदार खासदार राहिले आहेत. यामुळे त्यांच्या समर्थकांचे दावे खोटे आहेत, असे राऊत म्हणाले.

पुढे बोलतांना राऊत म्हणाले की, राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या मारेकऱ्याचा सन्मान करणे ही आपली संस्कृती नाही. तसेच शिवसेनेच्या कोट्यातील जागा आम्ही संभाजीराजेंना देण्यास तयार झालो. राजघराण्याचा, संभाजीराजेंचा सन्मान ठेवला यापेक्षा आम्ही काय करू शकत होतो. देशभरातील अनेक राजघराणी राजकीय क्षेत्रात येऊन विविध पक्षांमधून आपले सामाजिक कार्य पुढे नेत आहेत असेही राऊत म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या