…यामुळे वाढवली खासदार संजय राऊतांची सुरक्षा

jalgaon-digital
2 Min Read

मुंबई | Mumbai

शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. संजय राऊत यांच्या घर (Sanjay Raut Home) आणि सामनाच्या (Saamna Paper) कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबतची माहिती दिली आहे.

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यात वाद झाला होता. यात भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी करेक्ट कार्यक्रम करण्याची राऊतांना दिली आहे. यामुळे संजय राऊत यांना अधिक सुरक्षा देण्यात आली आहे. (Sanjay Raut Security Increased Decision)

या प्रकरणी आज संजय राऊत डीसीपी प्रशांत कदम (DCP Prashant Kadam) यांच्या भेटीसाठी पोहोचले आहे. यावेळी कदम यांनी राऊत यांच्यात सुरक्षेबाबत चर्चा झाली. कदम यांनी राऊत यांना सुरक्षे प्रश्नी काही सूचना दिल्या आहेत. आता राऊत यांच्याकडे दोन अतिरिक्त एसपीयूचे (SPU) जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच एसपीयूच्या एकूण 6 शस्त्रधारी जवानांची सुरक्षा देण्यात आली आहे. याव्यक्तीरीक्त १२ पोलीस जवानांसहीत साध्या वर्दीतील पोलिसांचा समावेशही त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत केला आहे. राऊत यांना सध्या वाय दर्जाची सुरक्षा मिळत आहे.

शिवसेना आणि नारायण राणे (Shivsena vs Narayan Rane) यांच्यातील वादानंतर दोन्हीकडून जोरदार शाब्दिक हल्ले होत होते. यामध्ये शिवसेनेकडून (Shivsena) संजय राऊत (Sanjay Raut) हे आघाडीवर राहून नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांच्या दोन पुत्रांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत होते. त्याचदरम्यान, निलेश राणे (Nilesh Rane) यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते जिथे भेटतील तिथे करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिला होता.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *