
मुंबई | Mumbai
'विधीमंडळ नव्हे चोर मंडळ' असं वादग्रस्त व्यक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. या वक्तव्यानंतर संजय राऊत अडचणीत सापडले. संजय राऊत यांना विधीमंडळाकडून हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती.
अखेर संजय राऊत यांनी हक्कभंग नोटीसीला उत्तर दिलं आहे. आपण केलेलं विधान हे विधीमंडळाला नाहीतर विशिष्ट गटाला उद्देशून बोललो आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा संजय राऊतांनी दावा केला आहे.
संजय राऊत यांनी नोटीसीला उत्तर देताना म्हटलं की, मी मुंबईच्या बाहेर असताना या वक्तव्याचा विपर्यास करण्यास आला. हे वक्तव्य विधीमंडळातील सदस्यांचा अवमान करण्याकरता केलं नसून हे वक्तव्य एका विशिष्य गटापुरतं होतं. विधीमंडळाच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता आणि नसणार आहे. मी केलेलं वक्तव्य तुम्ही तपासू पाहावं, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
नेमंक काय म्हणाले होते राऊत?
'विधीमंडळ नव्हे चोर मंडळ' असं वादग्रस्त वक्तव्य संजय राऊत यांनी केलं होतं. संजय राऊत यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षातील आमदार आक्रमक झाले होते. त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली होती. आमदारांच्या मागणीनंतर समितीची स्थापना करण्यात आली. संजय राऊत यांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती.