Friday, April 26, 2024
Homeराजकीयभाजपच्या १२ आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन; संजय राऊत म्हणतात...

भाजपच्या १२ आमदारांचं वर्षभरासाठी निलंबन; संजय राऊत म्हणतात…

मुंबई | Mumbai

पावसाळी अधिवेशनाची (monsoon season ) सुरुवात वादळी ठरली आहे. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरून भाजपच्या (bjp) आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन (12 BJP MLAs suspended for a year) करण्यात आले आहे. दरम्यान या कारवाईवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी भाजपावर (BJP) निशाणा साधला आहे.

- Advertisement -

नवाब मलिकांनी ट्विट केला विधानसभेतील राड्याचा व्हिडिओ, पाहा व्हिडीओ

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हंटलं आहे की, ‘काल सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता. वेगळ्या प्रकारे कोंडी करणार होते. पण मराठीत एक म्हण आहे. केले तुका झाले माका, अशी कोकणात म्हण आहे. ते आमच्यावर बॉम्ब (Bomb) टाकणार होते. त्यांच्या हातात बॉम्ब होता. बरं का. पण बॉम्ब (Bomb) त्यांच्या हातातच फुटला. एक चूक किती महागात पडू शकते हे त्यांच्या लक्षात आलं असेल,’ असा टोला राऊत यांनी लागावला आहे.

तसेच, ‘आता बारा आमदारांचं निलंबन झालेलं आहे. हा एक शिस्तीचा भाग आहे. शिस्ती मोडली जाते, अशाने सभागृहात दंगली होतील. पाकिस्तानच्या संसदेत (Pakistan Parliament) आपण पाहिलं. काही वेळेला बिहार (Bihar), उत्तर प्रदेशच्या (UttarPradesh) विधानसभेत आम्ही पाहिलं आहे. संपूर्ण दंगलीसारखं चित्र निर्माण झालं होतं. महाराष्ट्रात (Maharashtra) अशा परंपरा पडू नये, त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी कठोर निर्णय घेतला असेल’, असं राऊत बोलताना म्हणाले.

विधानसभेतील अभूतपूर्व गोंधळानंतर सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप

निलंबित झालेले ते १२ आमदार कोण?

डॉ. संजय कुटे, जामोद, जळगाव

आशिष शेलार, वांद्रे पश्चिम

अभिमन्यू पवार, औसा, लातूर

गिरीश महाजन, जामनेर, जळगाव

अतुल भातखळकर, कांदिवली पूर्व, मुंबई

पराग अळवणी, विलेपार्ले, मुंबई

हरिश पिंपळे, मूर्तिजापूर, अकोला

राम सातपुते, माळशिरस, सोलापूर

जयकुमार रावल, सिंदखेडा, धुळे

योगेश सागर, चारकोप, मुंबई

नारायण कुचे, बदनापूर, जालना

कीर्तिकुमार भांगडिया, चिमूर, चंद्रपूर

- Advertisment -

ताज्या बातम्या