Thursday, April 25, 2024
Homeराजकीय'त्या'मुळे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत

‘त्या’मुळे फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत

मुंबई | Mumbai

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यातील वातावरण चांगलच ढवळून निघालं आहे.

- Advertisement -

याच मुद्यावरुन विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी पाहायला मिळत आहेत. परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर माजी मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदांचा धडाका लावला आहे. तसंच, अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुनही राज्य सरकारला घेरलं आहे.

या सर्व घडामोडींदरम्यान शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे. ‘विरोधी पक्षनेते मोदींपेक्षा मोठे नेते असावेत, त्यामुळे त्यांना हे सांगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या मोठेपणाची उंची सह्याद्रीपेक्षा मोठी आहे, त्यामुळेच कदाचित ते पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत आणि विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारीही नीट सांभाळू शकले नाहीत.’ असा खोचक टोला संजय राऊत यांनी विरोधी पक्ष नेते संजय राऊत यांनी लगावला आहे.

नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार

तसेच ‘चौकशीला कोणाचाही नकार नव्हता. मुख्यमंत्री, अनिल देशमुख, आम्ही चौकशी करा म्हणत होतो, फक्त विरोधी पक्षनेते म्हणतात चौकशी नको आधी फाशी द्या,’ अशी टीका त्यांनी केली असून ‘वारंवार राजीनाम्याची आणि सरकार बरखास्त करण्याची मागणी यामुळे विरोधी पक्षाचं हसू होतं, लोक त्यांना मूर्खात काढतात हे समजलं पाहिजे. आमच्यासाठी हा विषय संपला असून यावर आता जास्त चर्चा होता कामा नये. यामध्ये विशेष घडामोडी घडतील असं वाटत नाही,’ असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.

ते पुढे म्हणाले,’राजभवन हा राजकारणाचा अड्डा झाला आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका होणारच आहे. राज्यपालांना आमच्यासाठी वेळ आहे की नाही हेही मला माहिती नाही. मात्र ते गेला काही दिवसांपासून भाजप नेत्यांसाठी फ्री आहेत, मुख्यमंत्र्यांनी आमच्या कॅबिनेटने राज्यपालांकडे १२ आमदारांच्या नियुक्तीसाठीची यादी पाठवून ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ होऊन गेलाय. त्या १२ नावांचं काय झालंय, राजभवनमधून त्याचा खुलासा व्हायला हवा. ते अभ्यास करतायंत ते ठिकंय, पण यातून काय त्यांना पीएचडी वगैरे मिळवायची आहे का? १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राज्यपालांना असा खोचक सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींदरम्यान अनिल देशमुख यांनी रात्री ट्विट केलं आहे. अनिल देशमुख यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्वरित चौकशी करण्याची विनंती केली आहे. अनिल देशमुख यांनी उद्धव ठाकरेंकडे सोपवण्यात आलेल्या पत्राचा फोटोही ट्विटमध्ये जोडला आहे. “मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांना परमबीर सिंग यांनी माझ्यावर जे आरोप केलेत त्याबद्दल चौकशी लावून, “दूध का दूध, पानी का पानी” करावे अशी मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन. सत्यमेव जयते,” असं अनिल देशमुख यांनी ट्विट केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या