The Kashmir Files चित्रपटावर राऊतांची खोचक प्रतिक्रिया म्हणाले, “पंतप्रधान मोदी काश्मीर फाईल्सचे...”

The Kashmir Files चित्रपटावर राऊतांची खोचक प्रतिक्रिया म्हणाले, “पंतप्रधान मोदी काश्मीर फाईल्सचे...”

मुंबई | Mumbai

'द काश्मिर फाईल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा नुकताच रिलीज झाला. सिनेमा रिलीज झाल्यानंतर या सिनेमाची आणि काश्मिरी पंडितांबाबत (Kashmiri pandit) सध्या जोरदार चर्चा होत आहे. या सिनेमावरुन सध्या विविध मतप्रवाह सुरु आहेत. यावरुन राजकारण (Politics on The Kashmir Files) देखील रंगल्याचं चित्र आहे.

या सिनेमावरून सुरू असलेल्या वादावर शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांना फटाकरलं आहे. 'द काश्मिर फाईल्स' सिनेमावरूनही काश्मीर फाईल वादात सापडलेला नाही. हा सिनेमा भाजपच्या (BJP) माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. पंतप्रधान (PM Modi) स्वत: त्या चित्रपटाचे प्रचारक आहेत, अशी खोचक टीका संजय राऊत (Sanjay Raut on The Kashmir Files) यांनी केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, 'द काश्मिर फाईल्स'मध्ये अनेक सत्यं दडवली आहेत. ताश्कंद फाईल्स (The Tashkent Files) चित्रपटात लालबहादूर शास्त्रींच्या (Lal Bahadur Shastri) मृत्यूचे खापर एका कुटुंबावर फोडण्याचा अजेंडा होता तसाच अजेंडा 'द काश्मिर फाईल्स'चा आहे. महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Govt) युती सरकारच्या काळात काश्मिरी मुलांसाठी वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगमध्ये पाच टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या. काश्मीरची खरी फाईल बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना माहिती आहे. नुसतं सिनेमा टॅक्स (Tax free) फ्री करून त्यांच्या वेदना कळत नाहीत, असं देखील राऊत म्हणाले.

तसेच संजय राऊत यांनी यावेळी बोलतांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. राज्यपाल राजकारण करत आहेत. राज्यापालांकडून (Bhagat Singh Koshyari) ही अपेक्षा नाही. राज्यपालांनी वारंवार कायद्याचं उल्लंघन केलं असून राज्यघटनेचाही भंग केला आहे, त्यामुळे अशा व्यक्तीला पदावर राहण्याचा अधिकार नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. (Sanjay Raut on Bhagat Singh Koshyari)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com