Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआशिष शेलारांशी गुप्त भेट?; संजय राऊत म्हणतात..

आशिष शेलारांशी गुप्त भेट?; संजय राऊत म्हणतात..

मुंबई | Mumbai

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राजकारणातील गुप्त भेटींचे सत्र सुरू आहे. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत (ShivSena MP Sanjay Raut) आणि भाजपा आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांची भेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र, खुद्द संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ही चर्चा फेटाळून लावली आहे.

- Advertisement -

‘महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये (Mahavikasaaghadi Govt) तीन पक्ष आहेत. या पक्षांमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी जाणूनबुजून काही अफवा पसरवल्या जातात. मी काल दिवसभर घरीच होतो. माझी कोणाशीही गुप्त भेट वगैरे काहीही झाली नाही. भाजपचे आशिष शेलार मला जाहीर कार्यक्रमात दोन ते तीन वेळा भेटले आहेत. आम्ही एकत्र कॉफीदेखील (Coffee) प्यायली आहे. पण ते सारं उघडउघड होतं. राजकीय मतभेद असले तरीही वैयक्तिक आयुष्यात सगळ्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. हीच महाराष्ट्राची (Maharashtra) संस्कृती आहे. पण त्यांच्याशी गुप्त भेट वगैरे या साऱ्या अफवा आहेत. असे अफवांचे कारखाने लवकरच दिवाळखोरीत निघतील,’ अशा शब्दात संजय राऊतांनी आशिष शेलारांशी भेट झाल्याचं वृत्त फेटाळून लावलं.

तसेच संजय राऊत यांनी आज एक ट्विट (Tweet) केलं आहे. ‘हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते है, जहाँ हमारे नाम से आग लग जाती है।’, असं सूचक विधान राऊत यांनी या ट्विटमधून केलं आहे. राऊत यांच्या या ट्विटचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), सुनील तटकरे (Sunil Tatkare), एकनाथ शिंदे (Eknath shinde), संजय राऊत (Sanjay Raut) आणि मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्यात गुप्त बैठक झाली होती. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्यांच्या गुप्त बैठकीची चर्चा सुरू असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांमध्ये दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत पंतप्रधान मोदीसुद्धा (PM Modi) फोनवरून सहभागी झाल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या