Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयतेजस्वीनं सर्वांच्या तोंडाला फेस आणला

तेजस्वीनं सर्वांच्या तोंडाला फेस आणला

मुंबई | Mumbai

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट होतांना दिसत आहे. बिहारमध्ये एनडीए तिसऱ्यांदा सरकार बनवण्याची शक्यता आहे. परंतु या निवडणुकीत नीतीश कुमार यांच्या पक्षाला फटका बसला असून भाजप आता बिग ब्रदर झाला आहे. भाजपला ७० ते ८० जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. यावर राज्यसभा खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, संपूर्ण केंद्रीय सत्ता तिथे कामाला लागली होती. मोदींनी १७ ते १८ सभा घेतल्या. तरीही ३० वर्षांचे तेजस्वी यांनी सर्वांना कामाला लावलं. तोंडाला फेस आणला हे मान्य करावं लागेल. कधी कधी लोक सामना हारतात. पण हारणाऱ्या संघाच्या खेळाडूला संघर्ष करत संघाला पुढे नेल्याबद्दल ‘मॅन ऑफ द मॅच’ दिलं जातं. बिहार निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्यासारखा एक चेहरा राष्ट्रीय राजकारणातील नवा चेहरा म्हणून पुढे आला आहे. ३० वर्षाचा एक तरुण ज्याच्या जवळ कोणी मदतीला नाही, मित्रपक्षांचं समर्थन नाही, कुटंबाचा पाठिंबा नाही, केंद्रात विरोधी पक्ष आहेत अशा प्रतिकूल परिस्थितीत प्रधानमंत्र्यांपासून ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत एकटा लढत असेल आणि निवडणूक आपल्याभोवती आणत असेल तर बिहारला एका नवा राजकीय चेहरा मिळाला आहे. यावर आगामी दिवसात विश्वस ठेवून भविष्य पाहू शकतो,” अशा शब्दांत संजय राऊत यांनी कौतुक केलं आहे.

तसेच, “७० जागा अशा आहेत जिथे ३० ते ४० टक्के मतमोजणी झाली आहे. रात्री १०-११ पर्यंत पूर्ण चित्र स्पष्ट होईल. एनडीएच्या बाजूने निकाल जातोय हे सध्या स्पष्ट दिसतंय. नितीश कुमार तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. भाजपा पहिल्या क्रमांकावर असून ‘मॅन ऑफ द मॅच’ तेजस्वी यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. लोकशाहीत असे निकाल येत असतात. जेव्हा पूर्ण निकाल हाती येतील तेव्हा त्यावर भाष्य करणं जास्त महत्वाचं आहे. “राजकारणात आता कोणतीही नैतिकता नाही, तसं असतं तर महाराष्ट्रातही राजकारण बदललं असतं. महाराष्ट्रातल्या कोणत्याही आत्महत्या किंवा मृत्यूचा फायदा कोणाला झाला असं वाटत नाही. तेजस्वी यांनी प्रचारात जी उसळी घेतली आणि विकास, शिक्षण, बेराजगाराचा मुद्दा आणला त्यानंतर सगळे मुद्दे मागे पडले. शिक्षण, विकास, रोजगार, आरोग्य यावर प्रचारात चर्चा झाली याचं श्रेय तेजस्वी यादव यांनाच जातं. काँग्रेसला चांगली कामगिरी करता आली असती तर तेजस्वी यादव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असते,” असं संजय राऊत यांनी सांगितलं. तेजस्वी यादव यांना मदत करता आली तर पहावी अशी शिवसेनेची भूमिका होती असंही यावेळी ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या