Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्यासत्ता स्थापनेसाठी भाजपची राष्ट्रवादीला होती ऑफर, पहाटेच्या शपथविधीवर खा. राऊत म्हणतात...

सत्ता स्थापनेसाठी भाजपची राष्ट्रवादीला होती ऑफर, पहाटेच्या शपथविधीवर खा. राऊत म्हणतात…

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीने (NCP) राज्यात सरकार स्थापन करावे, अशी पंतप्रधानांची इच्छा होती असा गौप्यस्फोट शरद पवार (Sharad pawar) यांनी केल्याने खळबळ उडाली. शरद पवार ज्याअर्थी असे बोलले त्याअर्थी ते खरे असावे. भाजपा सरकार स्थापन करण्यासाठी इतकी उत्तेजित झाली होती की, वाटेल ते करुन त्यांना महाराष्ट्रात (Maharashtra) सत्ता स्थापन करायची होती. मग याच्याशी बोला, त्याच्याशी बोला, याला फोडा, अजित पवारांना (Ajit Pawar) गाठा, आमच्या लोकांना गाठा असा मोठा उपक्रम भाजपकडून सुरु होता, अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशकात प्रसारमाध्यमांशी बोलताना केली…

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले की, शरद पवारांना आणि त्यांच्या पक्षाला ऑफर येत होती आणि कुठून काय बोलणी सुरु होती याबाबत आम्हाला माहीत आहे. ते आमच्यासोबत यासंदर्भात बोलले होते. त्या काळात आम्ही एकमेकांपासून कुठलीही गोष्ट लपवत नव्हतो. आमच्याकडे गुप्त काही नव्हते.

कोण काय बोलतोय, कुणाला भेटतोय याबाबत आमच्यात पारदर्शकता होती. मात्र भाजपला याबाबत माहिती नव्हती. अगदी अजित पवार (Ajit Pawar) शपथ घेण्यासाठी गेले त्यातदेखील पारदर्शकता होती, त्या पारदर्शकतेमुळेच भाजपचे सरकार सत्तेत आले नाही. असेही संजय राऊत म्हणाले.

नितेश राणेंना आणखी एक धक्का; अटकपूर्व जमीन मिळाला तरी…

मनमोहन सिंग यांच्यासारखा पंतप्रधान पाहिला नाही

लालबहादूर शास्त्री (Lalbahadur Shastri) यांच्यानंतर मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्यासारखा पंतप्रधान मी आयुष्यात पाहिला नाही. मनमोहन सिंग यांच्या काळात कोणावरही सूडाची कारवाई झाली नाही. ज्यांच्यावर कारवाई होणार होती तेव्हा मनमोहन सिंग यांनी स्वतः त्यात पुढाकार घेतला. स्वत: शरद पवारांनी ज्यांचे घोडे आज उधळले आहेत त्यांना वाचवले आहे. राजकारणात संयम महत्वाचा असतो. सत्तेचा आणि राज्यघटनेचा गैरवापर करु नये. राजकारणात हत्तीप्रमाणे उधळू नये, हत्तीदेखील कोसळतात, असे संजय राऊत म्हणाले.

‘हा’ तर कायदेशीर अपराध; सिंधुदुर्ग पोलिसांवर फडणवीस संतापले

काळजी घेण्याचे आवाहन

राज्यात रात्रीची संचारबंदी सुरु आहे, मात्र दिवसा संचारबंदी होऊ नये अशी माझी इच्छा आहे. दिवसा संचारबंदी लागली तर अर्थ चक्र थांबेल. सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, प्राजक्त तनपुरे, वर्षा गायकवाड यांनादेखील लागण झाली त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केले.

…म्हणून मी मास्क लावत नाही

आपल्या देशाचे पंतप्रधान जरी मास्क (Mask) लावा सांगत असतील तरी स्वत: मास्क लावत नाहीत. आम्ही पंतप्रधानांचे ऐकतो आणि मास्क लावत नाही. मुख्यमंत्री मास्क लावतात मात्र मोदी देशाचे नेते असून कोठेही मास्क लावत नाहीत. मोदी मास्क लावत नसल्याने लोकदेखील लावत नाहीत. मीदेखील पंतप्रधानांचे आचरण करतो. त्यामुळे मोदींनीसुद्धा मास्क लावावा, नियमांचे पालन करावे, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.

महाराज कालीचरण अटकेत; महात्मा गांधींबद्दल अपशब्द भोवले

काय म्हणाले शरद पवार?

भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करावे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची इच्छा होती. मात्र आमची विचारधारा वेगळी असल्याने हे शक्य नाही असे मी पंतप्रधानांना त्यांच्या कार्यालयात जाऊन सांगितले, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला.

व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा लसीचे प्रमाणपत्र; ‘असे’ करा डाउनलोड

काय म्हणाले अजित पवार?

शरद पवारांच्या वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, जेव्हा सर्वोच्च नेते बोलतात तेव्हा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने अजून त्यावर वक्तव्य करून गैरसमज पसरवण्याचे काही कारण नाही. त्यांनी काय सांगितले ते तुम्ही ऐकलेले आहे. मला त्याबद्दल काहीही बोलायचे नाही. मी सुरुवातीलाच सांगितले आहे, जेव्हा मला वाटेल, तेव्हा मी त्यावर बोलेन. तो माझा अधिकार आहे. संपला विषय, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या