
मुंबई | Mumbai
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान पार पडलं होतं. आज कर्नाटकात (Karnataka Elections) मतमोजणी प्रक्रिया सुरू आहे. २२४ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेस आघाडीवर तर भाजपा आणि जनता दल पिछाडीवर असल्याचं निकालावरून दिसत आहे. त्यावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी भाजपाला डिवचलं आहे.
"बजरंग बलीनेही कर्नाटकातील मोदींच्या प्रचाराला ठेंगा दाखवला" असं म्हणत खोचक टीका केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "बजरंग बलीनेही 'कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
कर्नाटकच्या जनतेने भाजपला निकारले आहे. मोदी-शहांनी सभा घेऊनसुद्धा तिथल्या जनतेचा भाजपवर रोष व्यक्त होईल अशी खात्री होती. कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव होईल.' तसंच, कर्नाटकचे चित्र देशभर दिसेल असा विश्वास व्यक्त करत शरद पवार यांनी यावेळी काँग्रेसपक्ष आणि उमेदवाराचे अभिनंदन केले आहे.
मीडिया जेपी नड्डाजी किंवा सीएम बोम्मईजी यांचा चेहरा पराभूत म्हणून दाखवू शकतो पण पंतप्रधान मोदींचे अपयश आहे कारण त्यांनी संपूर्ण प्रचार स्वतःबद्दल केला आहे" असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.
संजय राऊतांची टिका
संजय राऊत यांनी "देशाची मन की बात कर्नाटकच्या निकालातून बाहेर पडली, २०२४ च्या निवडणुकीत जे कर्नाटकात झाले तेच देशात होईल. कर्नाटकच्या जनतेने खोके सरकारच्या नेत्यांना लाथाडले, राज्यातील मोठी टोळी कर्नाटकात गेली होती. कर्नाटकातील पराभव हा मोदींचा पराभव आहे.
“कर्नाटकात काँग्रेस केवळ आघाडीवर नाही, तर सत्ता स्थापन करेल. काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळत आहे. काँग्रेसचा विजय कर्नाटकमधील भाजपाचा पराभव नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आहे. मोदी-शाहांनी हा पराभव स्विकारला पाहिजे. कारण, या दोन प्रमुख नेत्यांनी कर्नाटकात अक्षरशः तंबू ठोकला होता”, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
शरद पवारांचा भाजपला टोला
'कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. कर्नाटकच्या जनतेने भाजपला निकारले आहे. मोदी-शहांनी सभा घेऊनसुद्धा तिथल्या जनतेचा भाजपवर रोष व्यक्त होईल अशी खात्री होती. कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव होईल.' तसंच, कर्नाटकचे चित्र देशभर दिसेल असा विश्वास व्यक्त करत शरद पवार यांनी यावेळी काँग्रेसपक्ष आणि उमेदवाराचे अभिनंदन केले आहे.