शिवसेना कार्यकारणी बैठकीत कोणते ठराव झाले मंजूर?

उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे

मुंबई | Mumbai

शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. पण आता बंडखोरांचे बंड मोडून काढण्यासाठी शिवसेनेनं कंबर कसली आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शिवसेना भवनात पार पडली. या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत काही ठरावही मंजूर करण्यात आले आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, मंत्री सुभाष देसाई, खासदार अनिल देसाई, मंत्री अनिल परब, शिवेसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते.

शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत मंजूर करण्यात आलेले ठराव

१. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर कार्यकारणीचा पूर्ण विश्वास आहे. पक्षात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहेत.

२. शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे सर्व अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणी पक्षप्रमुखांना देत आहे.

३. बाळासाहेब ठाकरे व शिवसेना हे नाव कुणालाही वापरता येणार नाही.

४. शिवसेना बाळासाहेब ठाकरे याची होती, आहे आणि कायम राहील.

५. शिवसेनेची मराठी अस्मितेशी व हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com