आता जेलमध्ये बसून हनुमान चालीसा वाचा; संजय राऊतांचा राणा दाम्पत्याला टोला

आता जेलमध्ये बसून हनुमान चालीसा वाचा; संजय राऊतांचा राणा दाम्पत्याला टोला

मुंबई | Mumbai

नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) यांना वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (judicial custody) सुनावली आहे. दरम्यान दोघांच्या जामिनावर आता २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयानं त्यांच्या जामिनावर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. आता रवी राणा आणि नवनीत राणा यांची कारागृहात रवानगी होणार आहे.

दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयानंतर शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप (BJP) आणि राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली.

आता जेलमध्ये बसून हनुमान चालीसा वाचा; संजय राऊतांचा राणा दाम्पत्याला टोला
'शहनाज गिल'चा किलर लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर!

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, राणा दाम्पत्य महाराष्ट्रात धार्मिक उद्रेक निर्माण करून सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर पोलिसांकडून लावण्यात आलेले राजद्रोहाचे कलम योग्यच असून राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हा न्यायालयाचा निर्णय आहे, सरकारचा नव्हे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. प्रत्येक कारवाई ही कायद्यानेच होते, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

तसेच 'धर्माच्या नावावर राज्य उलथवण्याचा प्रयत्न कुठेही होऊ नये. मात्र अशा प्रकारे एखादा लोक प्रतिनिधी सरकार उलथवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला भाजप फूस देत आहे. मागच्या सरकारने भीमा-कोरेगावमध्ये हेच केलं. विचारवंतांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. संघर्ष निर्माण करायचा. मग त्यांच्या मनानुसार घडलं की राज्यपलांकडे जायचं. आणि राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे जाऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावायची, हा कट भाजप रचत असल्याचा' आरोप राऊत यांनी केला आहे.

आता जेलमध्ये बसून हनुमान चालीसा वाचा; संजय राऊतांचा राणा दाम्पत्याला टोला
“फक्त २४ तास पोलिसांना सुट्टी द्यावी, मग…”; नितेश राणेंचा शिवसेनेला इशारा

पुढे बोलतांना ते म्हणाले की, 'राणा दाम्पत्य म्हणजे काय टॉलस्टॉय आणि त्याची बायको नव्हेत. आता ते तुरुंगात बसून हनुमान चालीसा वाचू शकतात. राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा वाचण्याची इतकी हौस होती तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरी जावे, कोर्टात जावे किंवा एखादे सभागृह घेऊन हनुमान चालिसा वाचावी. महाराष्ट्रात हनुमान चालीसा वाचायला बंदी नाही. पण मातोश्रीत घुसून हनुमान चालीसा वाटण्याचा हक्क योग्य नाही. तुम्ही मातोश्रीत घुसलात तर आम्हीदेखील घुसू' असं इशारा त्यांना यावेळी दिला.

आता जेलमध्ये बसून हनुमान चालीसा वाचा; संजय राऊतांचा राणा दाम्पत्याला टोला
'त्या' जाहिरातीसाठी अक्षय कुमारला माफी का मागावी लागली?

Related Stories

No stories found.