
नाशिक | प्रतिनिधी Nashik
शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३५ आमदार सुरत (Surat) मध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेला मोठ्ठा धक्का बसला आहे. राज्य सरकारलाही यामुळे धोका निर्माण झाला असतानाच आता संजय राऊत (Shivsena leader Sanjay Raut) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुरतेत एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्याबाबत मोठे विधान केले आहे....
ते म्हणाले, काहीजण दबावापोटी तिथे अडकले आहेत. आमचे सुहास कांदे (Suhas kande) हेदेखील त्यातीलच एक आहेत. त्यांच्यासह अनेक आमदार लवकरच परततील. आम्हालाही इडीच्या धमक्या आल्या पण आम्ही पक्ष सोडला नाही.
दबाव असला तरी घाबरून जाऊ नये. सायंकाळपर्यंत किंवा रात्रीपर्यत अनेकांशी आपला संपर्क होईल असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.