उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, कोकणातील 'हा' आमदार शिंदे गटाच्या वाटेवर

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, कोकणातील 'हा' आमदार शिंदे गटाच्या वाटेवर

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसमोर (Shivsena) मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकासआघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळलं.

दरम्यान आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. शिवसेनेचा कोकणातील आणखी एक आमदार शिंदे गटात (Eknath Shinde camp) जाणार असल्याच्या चर्चांनी कालपासून जोर धरला आहे.

शिवसेनेचे कोकणात सध्या तीन आमदार आहेत. यात वैभव नाईक, भास्कर जाधव आणि राजन साळवी (Rajan Salvi) यांचा समावेश आहे. यापैकी एक आमदार राजन साळवी हे शिंदे गटात जाणार असल्याचं बोललं जातंय. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटातील आमदारांच्या ते संपर्कात असून राज्याचे सध्या अधिवेशन सुरु आहे.

या अधिवेशनादरम्यान, साळवी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला येत्या काही तासात आणखी एक बंडाला सामोरे जावे लागू शकते, अशी चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पूर्णपणे उध्वस्त झालेल्या शिवसेनेसाठी हा मोठा धक्का ठरू शकतो, असे म्हटले जातेय.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com