उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! माजी आमदारांनी ‘शिवबंधन’ काढले, हाती घेतले कमळ

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का!  माजी आमदारांनी ‘शिवबंधन’ काढले, हाती घेतले कमळ

मुंबई | Mumbai

शिवसेनेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अवधूत तटकरेंचा भाजप प्रवेश सुनील तटकरे आणि उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे. याशिवाय शिवसेना आणि सुनील तटकरेंच्या गडाला मोठा सुरुंग लावण्यासाठी भाजपनं ही मोठी खेळी केल्याचं बोललं जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अवधूत तटकरे यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. अवधूत तटकरे यांनी रोहा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद भूषवलं होतं. बारा वर्ष ते नगराध्यक्षपदी होते. त्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात त्यांनी श्रीवर्धन मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं.

२०१९ मध्ये चुलत बहीण अदिती तटकरेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली. काही काळ राजकारणापासून दूर राहिल्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलं होतं.

अवधूत तटकरे राजकारणात पुन्हा सक्रिय होत असतानाच राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांची एकी झाल्यामुळे तटकरे नाराज होते. त्यानंतर ते पुन्हा सक्रिय राजकारणापासून दूर गेले होते. अखेर त्यांनी भाजपचा हात हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com