Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यादसरा मेळाव्याच प्लॅनिंग? राज ठाकरे घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

दसरा मेळाव्याच प्लॅनिंग? राज ठाकरे घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

मुंबई | Mumbai

शिवसेना पक्षसंघटनेवरील नियंत्रणासाठी केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची (Shivsena) राजकीय ओळख असलेला दसरा मेळावा घेऊन आपणच खरी शिवसेना असल्याचे प्रस्थापित करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने घेतला आहे. त्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याबरोबरच भाजपकडून रसद मिळावी, यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरू असल्याचं समजत आहे.

- Advertisement -

याच दरम्यान एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. राज ठाकरे हे सहकुटुंब मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी जाणार आहे. आज संध्याकाळी साडे सहा वाजता ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) भेट घेतील. यानंतर वर्षा बंगल्यावरील बाप्पाचं दर्शन सुद्धा घेणार आहे.

तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून राज्यमंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना वर्षा बंगल्यावर स्नेहभोजनासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. त्यामुळे मंत्र्यांचं स्नेहभोजन आणि राज ठाकरेंची भेट याचं टायमिंग तर साधण्यात आलेलं नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच यासोबतच मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्या दसरा मेळाव्या बाबतच्या रणनीतीची चर्चा होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. पण याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या