Video : शिवसेना व तुमचे कॉम्बिनेशन कसं वाटतंय? शरद पवार म्हणाले...

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कुणी कितीही काहीही बोलले तरी पडणारे नाही. या सरकारमध्ये तीन पक्ष एकत्र येऊन चांगले काम करत आहेत. आम्ही हे सरकार काहीही झाले तरी चालवायचे आहे हे ठरवले आहे, तर आम्ही ते चालवणारच आहोत.

यात कुणीही खोडा घालू शकत नाही. मुख्यमंत्री (Chief Minister) चांगले काम करत आहेत, त्यांना तीनही पक्षातील सदस्यांचा चांगला पाठींबा आहे. त्यामुळे पाच वर्षे हे सरकार चालणार हे निश्चित असल्याचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी नाशिकमध्ये सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com