संजय राऊतांच्या अटकेनंतर ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

संजय राऊतांच्या अटकेनंतर ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

मुंबई | Mumbai

शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने अटक केली आहे. सध्या त्यांना मुंबईच्या ईडी कार्यालयात नेण्यात आलं आहे. ईडीने (ED) राऊत यांच्या घरातून ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त देखील जप्त केली आहे.

दरम्यान संजय राऊत यांच्या अटकेनंतर पहिल्यांदाच ठाकरे परिवाराची (Thackeray Family) प्रतिक्रिया समोर आली आहे. माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेसाठी सोमवारी सकाळी सिंधुदुर्गात दाखल झाले. यावेळी विमानतळावर प्रसारमाध्यमांनी आदित्य ठाकरे यांना गराडा घातला. संजय राऊत यांना ईडीकडून करण्यात आलेल्या अटकेबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आले.

त्यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, हे सर्व विरोधकांचा आणि महाराष्ट्राचा आवाज दाबण्यासाठी सुरु आहे. हे कटकारस्थान आहे, ही गोष्ट जगजाहीर असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. आता आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेत यावर काही भाष्य करणार का, हे पाहावे लागेल.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या नियोजित दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. कोणताही वाद नको म्हणून आमदार केसरकर यांच्या घरासमोरुन मिरवणूक नेण्यास शिवसैनिकांना अटकाव करण्यात आला आहे. तर पर्याय म्हणून उद्यान परिसर किंवा चिटणीस नाक्यावरुन मिरवूणक काढा, अशा सुचना वजा आदेश पोलिस खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com