Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यानिकटवर्तीयांवरील छापेमारीनंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

निकटवर्तीयांवरील छापेमारीनंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | Mumbai

मुंबईत (Mumbai) आज शिवसेना (Shivsena) नेत्यांच्या घरावर आयकर विभागाकडून (Income Tax) धाडसत्र सुरू झालं आहे. यात राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेनेचे नेते आणि शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त राहुल कनाल (Rahul Kanal) यांचा समावेश आहे. याच छापेमारीच्या पार्श्वभूमीवर मंत्री आदित्य ठाकरे (Minister Aaditya Thackeray) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रावर (Maharashtra) यापूर्वीही अशाप्रकारची आक्रमणं झाली आहेत. हे दिल्लीच (Delhi) आक्रमण आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये निवडणुका (Election) जवळ आल्यापासून महाविकासआघाडीला घाबरल्यामुळे भाजपकडून (BJP) केंद्रीय तपासयंत्रणांचा वापर सुरु आहे. इतर राज्यांमध्येही निवडणुकांच्यावेळी अशा धाडी पडल्या होत्या. केंद्रीय तपासयंत्रणा या भाजपच्या प्रचार यंत्रणा आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांवर धाडी पडत आहेत. पण महाराष्ट्र थांबणार नाही, झुकणार नाही, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.

दरम्यान राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने (it department) धाड मारलेली असतानाच आता आणखी एका शिवसैनिकाच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीय आणि शिवसैनिक संजय कदम (sanjay kadam) यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारली आहे.

सकाळपासूनच कदम यांच्या घरावर आयकर विभागाने धाडसत्रं सुरू केलं आहे. तसेच पुण्यातील आरटीओचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या घरावरही आयटीने छापा मारल्याची सूत्राची माहिती आहे. आयकर विभागाने एकाच दिवशी दोन शिवसेना नेत्यांच्या घरांवर छापेमारी केल्याने शिवसेनेचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या