Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याआदित्य ठाकरेंचे लखनऊमध्ये जंगी स्वागत; म्हणाले, “प्रभू श्रीरामाच्या भूमीत...”

आदित्य ठाकरेंचे लखनऊमध्ये जंगी स्वागत; म्हणाले, “प्रभू श्रीरामाच्या भूमीत…”

मुंबई | Mumbai

शिवसेना (Shivsena) नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. थोड्या वेळापूर्वीच आदित्य ठाकरे लखनऊ विमानतळावर (Lucknow airport) पोहोचले.

- Advertisement -

लखनऊ विमानतळावरुन बाहेर येताच आदित्य ठाकरे यांचं ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी शेकडोंच्या संख्येने शिवसैनिक (Shivsainik) आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी उपस्थित होते.

दरम्यान आदित्य ठाकरे विमानतळाच्या बाहेर पडताच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना घेरले. यावेळी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना अयोध्या दौऱ्याचा उद्देश विचारण्यात आला.

त्यावर आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, मी आज अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. यामध्ये राजकारणाचा कोणताही भाग नाही. हा आमच्यासाठी श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या