शिवसेनेच्या 'त्या' १२ खासदारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

शिवसेनेच्या 'त्या' १२ खासदारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

नवी दिल्ली । New Delhi

शिवसेनेतील बंडखोरी दिवसेंदिवस वाढत असून आमदारांपासून सुरु झालेली बंडखोरी आता खासदारांपर्यंत पोहचली आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांचे बंड (Rebellion MLA) घडवून शिवसेना पक्षप्रमुख (ShivSena chief) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का दिला होता. त्यानंतर शिवसेनेच्या खासदारांच्याही बंडाची चर्चा सुरु होती.अखेर या चर्चेला आज पूर्णविराम मिळाल्याचे दिसत आहे...

काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांनी कायदेतज्ञांची भेट घेतली होती. त्यानंतर शिवसेनेचे (Shivsena) १२ खासदार मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरु होती.यानंतर आज शिवसेनेच्या १८ पैकी १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवी दिल्लीत (New Delhi) भेट घेतली असून ते सर्व खासदार शिंदे गटात (Shinde Group) सामील होणार असल्याचे समजते.

दरम्यान, शिवसेनेच्या या सर्व १२ खासदारांनी लोकसभा अध्यक्ष (Lok Sabha Speaker) ओम बिर्ला (Om Birla) यांना आज सकाळी पत्र देऊन लोकसभेत वेगळा गट स्थापन करण्यास मान्यता देण्याची विंनती केली होती. यासोबतच हे सर्व खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) व गृहमंत्री (Home Minister) अमित शहा (Amit Shah) यांचीही दिल्लीत भेट घेण्याची शक्यता आहे.

या खासदारांनी घेतली भेट

हेमंत गोडसे (Hemant Godse) भावना गवळी (Bhavana Gawali) संजय मंडलिक (Sanjay Mandlik) श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) राजेंद्र गावित (Rajendra Gavit) श्रीरंग बारणे (Shrirang Barne) कृपाल तुमाने (Krupal Tumane) सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) राहुल शेवाळे (Rahul Shewale) हेमंत पाटील (Hemant Patil) प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com